महाराष्ट्र मराठी | MH-MARATHI
MAHARASHTRA MARATHI NEWS, STORIES, SOCIAL MEDIA
अहिल्याबाई होळकर
April 25, 2015 महाराष्ट्र मराठी
अहिल्याबाई होळकर
अहिल्याबाई होळकर किंवा अहिल्यादेवी होळकर (इ.स. १७२५ ते इ.स. १७९५) या मराठा साम्राज्यातील महत्त्वाच्या व्यक्ती होत. त्यांना पुण्यश्लोक या पदवीने संबोधित करण्यात येते.
माळवा प्रांताचा कारभार त्यांनी बांधला. त्या मल्हारराव होळकरांच्या सून होत. मुलाचे मृत्युनंतर मल्हाररावांनी त्यांना सती जाऊ दिले नाही. भारतभरात त्यांनी अनेक मंदिरे, घाट बांधली वा त्यांचा जीर्णोद्धार केला. महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महंमदाने ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे एक देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात. त्यांच्या स्मरणार्थ, इंदूर विद्यापीठास त्यांचे नाव दिलेले आहे.पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर , यांना भारताच्या “कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट” म्हणुन ओळखतात. (१७२५ – १७९५, राज्यकालावधी १७६७-१७९५) ही भारताच्या,माळवा साम्राज्याची, होळकर घराण्याची ‘तत्वज्ञानी राणी’ म्हणुन ओळखली जाते. तीच जन्म महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. तीने नर्मदातीरी, इंदोर च्या दक्षिणेकडील महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली. अहिल्यादेवीचे पती खंडेराव होळकर यांचे सन १७५४ मध्ये,कुम्हेरच्या लढाईत निधन झाले. १२ वर्षांनंतर, तिचे सासरे मल्हारराव होळकर हेही मृत्यु पावले.तिने, आपल्या साम्राज्याचे तुंगांपासुन रक्षण केले. ती लढाईत स्वतः सैन्याचे नेतृत्व केले.तिने,तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणुन नेमणुक केली.ती न्यायदानासा ठी प्रसिद्ध होती,एकदा तर तिने स्वतः च्या मुलास त्याच्या दंड करण्याजोग्या कामांमुळे त्यास हत्तीच्या पायदळी तुडविण्याची शिक्षा केली. राणी अहिल्यादेवी हीने अनेक हिंदू मंदिरांचे बांधकाम केले आणी महेश्वर,इंदोर ची सजावट केली. ती अनेक देवळांची आश्रयदाती होती.त्यात,तीने तिच्या राज्याबाहेरही अनेक मंदिरांचे व इतर अनेक तिर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यापैकी,द्वारका , गुजरात , काशी च्या पुर्वेस गंगातीरावर वाराणसी ,उज्जैन मध्य प्रदेश, नाशिक महाराष्ट्र व परळी वैद्यनाथ महाराष्ट्र याचा प्रामुख्याने समावेश आहे.सोमनाथ चे अपवित्र व ध्वस्त झालेले देउळ बघुन अहिल्यादेवींनी शिवाचे एक देउळ बांधले जे सर्व हिंदूद्वारे अजुनही पूजिल्या जाते.
बालपण :-
अहिल्यादेवींचा जन्म मे ३१ इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते व धनगर होते. त्याकाळी स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही तिच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यावाचण्यास शिकवले होते. बाजीराव पेशव्यांचे एक सरदार मल्हारराव होळकर व माळवा प्रांताचे जहागीरदार होते. ते पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते. आख्यायिकेनुसार, ८ वर्षाच्या अहिल्यादेवींना, मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला, स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले.त्या मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बगत होत्या. मल्हारराव होळकरांच्या त्या सून होत. मुलाच्या मृत्यूनंतर मल्हाररावांनी त्यांना सती जाऊ दिले नाही. त्यांच्या स्मरणार्थ, इंदूर विद्यापीठास त्यांचे नाव दिलेले आहे.
शासक :-
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे तैलचित्रअहिल्यादेवीचे पती खंडेराव होळकर सन १७५४ मध्ये लढाइत मारले गेले. १२ वर्षानंतर तिचे सासरे मल्हारराव मृत्यू पावले. १७६६ पासुन १७९५ मध्ये तिच्या मृत्युपर्यंत, मल्हाररावांनी तिला प्रशासकीय व सैन्याच्या कामात तिला पारंगत केलेले होते. त्याआधाराने अहिल्याबाईने माळव्यावर राज्य केले. १८व्या शतकात, सत्तेसाठीच्या युद्धादरम्यान, मल्हाररावांनी सन १७६५ मध्ये तिला लिहिलेल्या पत्रावरुन त्यांचा तिच्या कर्तृत्वावर किती विश्वास होता हे दिसुन येते.
“चंबळ पार करुन ग्वाल्हेर येथे जावा.तेथे तुम्ही ४-५ दिवस मुकाम करु शकता.तुम्ही मोठे सैन्य ठेवु शकता व त्यांचे शस्त्रांसाठी योग्य तजवीज करा…..कुच करतांना,मार्गावर तुम्ही सुरक्षेसाठी चौक्या लावा.” पूर्वीच शासक म्हणून तरबेज झाल्यामुळे, मल्हारराव व मुलाच्या मृत्यूनंतर, अहिल्याबाईंनी स्वतःलाच राज्यकारभार पाहू देण्याची अनुज्ञा द्यावी अशी पेशव्यांना विनंती केली. त्यांनी शासन करण्यास माळव्यात अनेकांचा विरोध होता, पण होळकरांचे सैन्य अहिल्याबाईंच्या नेतृत्वाखाली

No comments:
Post a Comment