शिक्षक कट्टा

शिक्षक कट्टा

Friday, June 2, 2017

मोबाईल

🙏 महाराष्ट्र पोलिस 🙏

तुमचा मोबाइल हरवला किंवा चोरीला गेला तर ?...
असा प्रश्न नेहमी सतावत असतो. अशावेळी काय कराल ?

त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत
करण्यासाठी ही माहिती देत आहोत.
ती नीट वाचा आणि बिनधास्त रहा.
तुम्हीच तुमचा मोबाइल शोधून काढा.

☑१. तुमच्या मोबाइलवर डायल
करा  *#06#

☑२. तुम्हाला आएमईआयचा (IMEI) १५ अंकी नंबर मिळेल. हा नंबर महत्वाचा आहे. तो जपून ठेवा.

☑३. तुमचा मोबाइल चोरीला गेला तर हा १५ अंकी नंबर महत्वाची भूमिका बजावणार आहे.

☑४. मोबाइल हरवला असेल किंवा
चोरीला गेला तर cop@vsnl.net वर
मेल करा. यामध्ये आयएमईआय (IMEI) नंबर द्या.

☑५. मोबाइल हरवला तर
तुम्हाला पोलिसात जाण्याची गरज नाही.

☑६. cop@vsnl.net वर मेल केल्यानंतर माहिती मिळेल.

☑७. IMEI नंबर वरून २४ तासात
आपला मोबाइल सिम चेंज केले असेल
तरी ट्रेस होईल. मोबाइलचे सध्य
ठिकाण समजेल.

☑८. cop@vsnl.net वर तुमचे नाव, पत्ता, मोबाइल मॉडेल, मेड इन,
शेवटचा वापरलेला सिम नंबर, तुमचा मेल आयडी, आएमईआय नंबर आवश्यक आहे.


सर्वांना कळू दे...आपला
       🙏 🇮🇳 🙏
      महाराष्ट्र पोलिस

Thursday, April 27, 2017

विचारमंथन

एक दिवस नेहमीप्रमाणे ऑफीसमध्ये आलेला प्रत्येक कर्मचारी समोरच्या बोर्ड वाचून आश्चर्य चकित होत होता.

"तुमची या कंपनीमधील प्रगती रोखणाऱ्या व्यक्तीचा काल मृत्यु झाला आहे, त्याच्या अंत्ययात्रेत नक्की सामिल व्हा.  "

सुरवातीला प्रत्येकाला कुठल्या न कुठल्या सहकाऱ्या बद्दल वाईट वाटलं.

पण नंतर उत्सुकता वाढली, माझी प्रगती रोखणारा नक्की कोण????

यासाठी प्रत्येकजण शवपेटीच्या जवळ जाऊ लागला.
शवपेटीत डोकावून बघताच प्रत्येकाचे डोळे विस्फरले, शरीर स्तब्ध झाले, तोंडातून शब्द फुटेना.

कारण शवपेटीत एक मोठा आरसा ठेवला होता. प्रत्येकजण त्यात स्वतःला बघत होता.

शवपेटीच्या जवळच एक बोर्ड ठेवला होता,

*"या जगात तुम्हाला जर कोणी प्रगती पासून रोखु शकतो तर तो फक्त अन फक्त तुम्ही स्वतः"*

कंटाळा, आळस, नाकर्तेपणा, कारणे सांगणे, प्रत्येक गोष्टीमधून पळवाट काढणे हे फक्त तुम्ही फक्त स्वतःसाठी करत असता.

तुमचे आयुष्य कधीही मित्र, कंपनी, जॉब, बॉस बदलल्यामुळे बदलत नाही.

ते बदलते फक्त आणि फक्त तुम्ही बदलता तेव्हाच.

आयुष्याच्या शेवटापर्यंत दुसऱ्याला कितीही दोष दिला तरी तुमची परिस्थिती बदलणाार नाही.
दुसऱ्याच्या आड़ तुमचा नाकर्तेपणा किती दिवस झाकाल?

*तुम्ही तेव्हाच मोठे होवू शकता; जेव्हा तुम्ही स्वतः मोठे व्हायचं ठरवाल.* अन्यथा या जन्मात तुम्हाला मोठे करणे कुणालाही शक्य नाही.

        *-  तुमच्या प्रगतीत साथ देणारा तुमचा मित्र!*😊 Keep it up

Sunday, April 23, 2017

आरक्षण हा विषय खुपच जोर धरत आहे. लोक काय वाट्टेल ते याविषयी बोलत आहेत. काही लोक म्हणतात आरक्षण बंद करा, काही म्हणतात आरक्षण आर्थिक आधारावर द्या, काही म्हणतात धर्मावर द्या, काही म्हणतात आम्हाला नाही दिलं तर कोणालाच देउ नका ! अशी आरक्षणाच्या मागणीची ओरड सुरु आहे. याविषयी घेतलेला विश्लेषणात्मक आढावा.
     मुळात आरक्षण म्हणजे काय ?याचा लोक सरळसरळ अर्थ लावतात " राखीव जागा " म्हणजे अर्थातच आरक्षण .! यातच  लोक गोंधळ करतात. ते स्वतः संभ्रमीत असतात आणि इतरांनाही संभ्रमीत करतात. _"आरक्षण " याचा सोपा आणि खरा अर्थ " किमान प्रतिनिधित्वाची संधी होय " ( minimum opportunity for representation )_ प्रतिनिधित्व कोणाचे ? तर त्या लोकांचे ज्या लोकांना हजारो वर्षे त्यांच्या मुलभुत हक्कांपासुन, विकासापासुन, वंचित ठेवले त्यांच्या उत्कर्षाची संधी जी नाकारली गेली तो उत्कर्ष साधण्यासाठी दिलेली संधी होय.
      मुळात आरक्षणाची सुरुवात कोणी केली ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ? अजीबात नाही !, शाहु महाराजांनी ? बिलकुल नाही. महात्मा फुलेंनी ? कदापि नाही. तर याची सुरुवात केली हिंदु धर्माचे शिल्पकार मनु यांनी...! किती टक्के ? तर १००%.
धर्मपंडीतांसाठी, (धर्ममार्तंडांसाठी) संपुर्ण आरक्षण होते.१००% राज्यसत्ता यांची, १००% धर्मसत्ता यांचीच, १००% शेतजमिनी यांच्याच ताब्यात, १००% व्यापार यांच्या तावडीत, १००% संपत्ती यांच्या मालकीची. असे सर्व अधिकार आणि संपत्ती याची मिरासदारी यांच्याकडे हजारो वर्षे होती. आणि बाकीचे लोक इतके मागासलेले, इतके अज्ञानी राहीले कि त्यांच्या शेकडो पिढ्या तशाच राहील्या. त्यांना स्वाभिमान काय असतो, शिक्षण काय असते, मानवी मुल्ये काय, जगण्याचा हेतु काय ? हेच कळलं नाही. आणि याचा परीपाक असा झाली कि एकुण संपुर्ण जातीच्या जाती वंचित राहील्या. गुलाम बनल्या..!

        आर्थिक आधारावर आरक्षण मागणे मुर्खपणाचे आहे.! आरक्षण हा गरीबी हटावचा कार्यक्रम नाही.( Reservation is not for the bread and butter, but it is for the participation in administration, policy making and decision making. ) आरक्षण हा भाजी भाकरीचा खेळ नाही. तर प्रशासनामध्ये सहभागासाठी आहे. योजना आणि निर्णय घेण्यामध्ये. आजचा गरीब उद्या श्रीमंत होऊ शकतो तर आजचा श्रीमंत उद्या गरीब होऊ शकतो. जे गरीब आहेत त्यांच्या उत्कर्षासाठी इतर मार्ग आहेत. त्यांच्यासाठी वेगळ्या रंगाचे रेशनकार्ड आहे, कमी किमतीत धान्य मिळते, सबसिड्या आहेत, जिवनदायी योजना आहेत, कमी उत्पन्नावर आधारीत शिष्यवृत्याही आहेत, अश्या अनेक योजना आहेत. आणि हवे असल्यास शासन आणखी राबवु शकते पण हे सर्व मागण्याचा मार्ग आरक्षण नाही.

        डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे एक वाक्य येथे खुप काही सांगुन जाते." तुम्ही गरीब आहात म्हणुन शुद्र नाही आहात तर तुम्ही शुद्र आहात म्हणुन तुम्ही गरीब आहात. म्हणुन आरक्षण हे व्यक्तीकेंद्री म्हणजे एका विशिष्ट माणसाला नाही तर एका विशिष्ट जातीला दिले आहे. काहीजण  म्हणतात कलेक्टरचा मुलगाही आरक्षण घेतो. अहो..! जातीची संपुर्ण टिम, लॉबी असते, एक वर गेला याचा अर्थ पुर्ण जात वर गेली असा होत नाही. माणुस कितीही मोठ्या पदाला गेला तरी अवहेलना  वाट्याला येतेच. उदा.एखाद्या कार्यालयात जसे शुद्र असतात तसेच शुद्रेत्तरही असतात. एखादा सवर्ण  चुका करत असेल तर लोक त्या, त्या व्यक्तीला दोष देतात पण एखादा शुद्र समाजातला चुका करत असेल तर " ये साला जातही ऐसा है .! " असं म्हणुन सरसकट संपुर्ण शुद्र समाजाची निंदा केली जाते यामागे दडलेली जातीयतेची सुप्त भावना असते. म्हणुन गरीब श्रीमंत बनु शकतो. मात्र शुद्र कितीही मोठा बनु द्या तो शुद्रच राहतो.

    आर्थिक आधारावर आरक्षण हे दिलेलेच आहे. ओबीसींनी ओबीसीमध्ये साळी, कोळी, याचबरोबर माळी, कुणबी या शेतकरी जातीबरोबरच दैवेज्ञ ब्राम्हण या उच्चवर्णीय जातींचासुद्धा समावेश आहे. ओबीसींना आरक्षणाचा निकष सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण हा आहे. त्याला क्रिमीलियरची अट लावली आहे. कारण जर ओबीसींची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक उत्थान झाले तर यांना वगळता येते. अशाप्रकारे आरक्षण दिले आहे. तरीही आरक्षणाचा बँजो लोक वाजवत आहेत. एससी आणि एसटीचे निकष अस्पृश्यता आणि शोषण आहेत. कारण ते कितीही मोठ्या पदावर गेले तरीही उच्चनिच्चतेची त्यांच्याबद्दलची भावना जात नाही.
         लोक म्हणतात ते सर्व सोडा आरक्षण कधी संपणार? मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व. मग प्रतिनिधित्व संपायला पाहीजे का? लोक याच्या खोलवर जात नाहीत आणि नंतर गैरसमज करुन घेतात. समजा १०० जागा आहेत भरायच्या नोकरीच्या. यामध्ये प्रत्येक जातीचे लोक यायला पाहीजे. पण दुर्दैवाने  या पदावर sc, st, nt ची पदे भरली जात नाहीत. कारण उमेदरवार निवडणारेच उच्चवर्णीय असतात..!आणि म्हणुनच मागासलेल्या जाती आणखीन मागास राहतात.
     दिल्लीत कॅबीनेट सचिवांच्या ९६ पदे( posts) आहेत. यात sc किती तर १ फक्त एक ?obc किती ? तर ४ म्हणजे उरलेल्या जागा उच्चवर्णीयांच्या ताब्यात! मग मला सांगा अनुशेष ( backlog) भरला जात नाही आणि वरुन  आरक्षण बंद करा ? अगोदर अनुशेष तरी भरा.

          काही माणसं म्हणतात स्वातंत्र्याला एवढी वर्षे झाली तरी लोक आरक्षण घेतात. मात्र हे लोक तेंव्हा जाणिवपुर्वक विसरतात कि एवढ्या वर्षांनीही हे लोक जातियता पाळतात. अन्याय-अत्याचारांच्या घटनांत घट होण्याऐवजी वाढच होत आहे. उत्तर प्रदेशमध्ये एका मागासवर्गीय मुलीची फक्त सावली पाण्यावर पडली म्हणुन तिला मारलं, नुकतचं लातूरमध्ये दलित समाजातील व्यक्तीच्या  शेतात चांगलं पिक आलं म्हणुन जनावरे घातली शेतात. विरोध केला तर मारहाण केली जबर, पी.एच.डी. करणारा हुशार विद्यार्थी रोहीत वेमुला याला त्रास देउन आत्महत्येस प्रवृत्त केले, एके ठिकाणी संपुर्ण मागासवर्गीय कुटुंबाला जाळलं , निष्पाप मुले बळी पडली, पंजाबमध्ये मागासांना ट्रॅक्टरखाली चिरडुन मारले, फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या गाण्याची रिंगटोन मोबाईल मध्ये वाजली म्हणुन शिर्डीत तरुणाला मारलं नंतर रिक्षा अंगावरुन नेली, गुजरात मध्ये चांभारांना अमानुषपणे मारून त्यांच्यावर लघुशंका केली जाते, बहिष्कार घातले जात आहेत. शासन प्रशासन हे रोखण्यासाठी हतबल ठरतंय  कारण ठराविक वर्गाला हे होऊच द्यायचे नाही. आणि म्हणुनच मोक्याच्या ठिकाणी बहुजनांनी, मागासवर्गीयांनी जायला हवे. म्हणुनच आहे आरक्षण.
        आरक्षण आपल्याच देशात नाही तर इतरही देशात आहेत. अमेरिकेच्या अफेर्मेटिव अँक्शन पॉलिसीमध्ये श्वेत अमेरिकेनबरोबर अश्वेत अमेरिकन, ई.यांनाही प्रतिनिधित्वाची संधीची तरतुद केलेली आहे. आरक्षणाच्याबाबतीत नेहमीच गुणवत्तेचा बाऊ केला जातो. जसेकाही गुणवत्ता ही मिरासदारी आहे.
अरे.! जरी आरक्षण असलं तरी त्याला शिक्षण घ्यायलाच लागते. एखादी पोस्ट असली आणि आरक्षण आहे म्हणजे केणत्याही अडाणी माणसाला नाही निवडत. त्यालाही शिक्षण पुर्ण करावं लागतं.
तोही त्याच शाळेत शिकतो ज्या शाळेत उच्चवर्णीय शिकतो, तोही तोच अभ्यास करतो जो उच्चवर्णीय करतो, त्यालाही तेच शिक्षक शिकवतात जे उच्चवर्णीयाला शिकवतात, तोही तिच परिक्षा देतो जो उच्चर्णीय देतो, पास होतो, मगच निवडला जातो. असे असुनही जर कोणी गुणवत्तेचा बाऊ करत असेल तर ते चुकीचे आहे असं मला वाटते. मेरिटचा प्रश्नच येत नाही.
उदा. समजा घोड्यांची शर्यत चालु आहे. पण एक घोडा लंगडा आहे. तगड्या घोड्यांनी जाणिवपुर्व लंगडं केलं त्याला. मग कशी होणाल शर्यत ?  त्या घोड्याला रेषेच्या थोडं पुढे उभ करावंच लागेल तरच शर्यत होईल खरी. यालाच म्हणतात आरक्षण.
           जाती नष्ट व्हायला पाहीजे. तरच आरक्षण नष्ट होईल. आरक्षण हे जरी कृत्रिम असलं तरी एकप्रकारे त्याला नैसर्गिकच म्हणावे लागेल. कारण आरक्षणामुळे नैसर्गिक मानवी हक्क मिळतात. आरक्षण दुसरं तिसरं काहीच नसुन फक्त प्रतिनिधित्वाची संधी आहे.

 आरक्षणामुळे देश मागे जात आहे अशी ओरड आरक्षणविरोधी लोक करतात. खरंतर आरक्षणामुळेच देश पुढे जात आहे. कारण त्या लोकांनाही संधी मिळत आहे जे लोक हजारो वर्षापासुन वंचित होते. देश कोणत्या गोष्टीमुळे मागे जात आहे तर जातीयतेमुळे.

       आरक्षण हे ५०% पेक्षा जास्त नसते. म्हणजे या देशातले ८५-९० % लोकांमधुन फक्त ५०% लोक निवडतील आणि उरलेल्या ५०% जागेवरती जे अल्पसंख्येने आहेत ते सर्व निवडतील..! अलिकडेच वाचनात आलं कि एससीच्या त्याच्याकडे संपुर्ण गुणवत्ता असुनही केवळ त्याने ओपनमधुन फॉर्म भरला आणि मुलाखतीमध्ये त्याला सांगितलं अस करता येणार नाही म्हणुन. बघा ही मानसिकता.
     आज बहुजन उद्धारक राजे शाहू , राष्ट्रपिता फुले,  डॉ.बाबासाहेब आंबेडकर नाहीत. पण त्यांची शिकवण " शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा" ही आपल्यासोबत आहे.याचा आपण प्रत्येकाने गांभीर्यपुर्वक विचार  केला पाहीजे. आजच्या सुशिक्षित तरुणांनी समाजात याविषयी जागरुकता निर्माण करायला हवी. लाचारीने  जगले नाही पाहीजे. आरक्षण हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात अंतर्भुत केले आहे. जय शिवराय, जय संविधान, जय भारत.

Sunday, April 16, 2017

पायभूत श्रेणी

[4/9, 18:04] ‪+91 75889 05203‬: पायाभूत चाचणी शेकडेवारी काढण्याची सोपी पद्धत
🅰🆚

वर्गाचे शेकडा प्रमाण

मराठी व गणित दोन्हीचे वेगवेगळे खालील सूत्राने काढावे.

  सर्व विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज ×100
  ------------------------------------------------
   वर्गाचा पट × चाचणीचे कमाल गुण

उदा. माझ्या शाळेचा 3 री चा पट 12 आहे.
12  विद्यार्थ्यांच्या एकूण गुणांची बेरीज 340 आहे. 3 री साठी चाचणीचे कमाल गुण 40 आहेत.

340 × 100
------------------
12 × 40

   34000
 = -----------
    480

= 70.83


शाळेचे शेकडा प्रमाण

विषयनिहाय खालील प्रमाणे काढावे.

सर्व वर्गांच्या शेकडा प्राणाची सरासरी काढावी.

उदा. 4 थी पर्यंत वर्ग असलेल्या शाळेत
एका शाळेच्या मराठी विषयाचे शेकडा प्रमाण

 2 री  72%
3 री   85.5%
4 थी  91%


शाळेच्या मराठी विषयाचे शेकडा प्रमाण =

72 + 85.5 + 91
------------------------
        3

=    82.83

असेच गणित विषयासाठी करावे.


शाळेचे अंतिम शेकडा प्रमाण मराठी व गणित विषयाची सरासरी काढून ठरवावे.

मराठी शे. प्रमाण + गणित शे. प्रमाण
------------------------------------------------

                        2

उदा.
गणित विषयाचे शेकडा प्रमाण 92.5 मानू.


82.83 + 92.5
---------------------
          2

= 87.66%

आता शाळेची श्रेणी खालील प्रमाणे काढावी.

81 ते 100   अ
61 ते 80     ब
41 ते 60     क
0   ते 40      ड

(पाहा: प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र GR पान नं  10 )
[4/10, 16:38] Sandip Nikam Sir: 📖 *ज्याना इंग्रजी येतं पण*
*अहिराणी नाही येत*
 *त्यांच्या साठी फक्त वाचा, पाठ करा*
 *आणी ८ दिवसात*
 *अहिराणी...बोलू लागा.*

Oh my god -
*ओ माय व.

Brilliant -
*दीड शाना*

Be quick -
 *उकाव् मार चपाटा*

Best -
*बुभारी शे*

Don't challenge -
*मना वाटाले येवानं न्हाई*
Go to sleep -
*पड तथा*

Have u gone mad -
 *येड़ा बिडा व्हयना का रे...*

Are you ok?-
*खोपड़ी जाग्यावर शे ना?*

Come here -
*आथा शिलग...*

u r too fast -
*इतली घाई कसले तठे काई जेवाले वाडेलशे का*


I will kill you -
*मारीच टाकसु.*

Simple -
*वायबार .*

Come on.. u can do it -
*जमाड़ी लेशी भो तू..*

Fooled someone -
 *येडा मा काढी टाकाभो त्याले...*

You're in trouble -
*वाट लग्नी तुनी.*

Don't try that hard -
 *कितली बी आपट ?*
*तूना तर काहीनई होवाऊ *

Go to hell -
*शीलग तथा *

Shame on you -
*लाज शे का तुले..*

Get lost -
*शीलग ....*

Don't worry?
*जाव मारो तथ*

Oh.. shit -
 *हत त्यानी मायले*

Damn you -
*तुले मरी माय खायजो*

यूट्यूब व्हिडिओ

Gif फ़ाइल कशी तयार करावी?  https://youtu.be/VaPrJRgrxkQ

Saturday, April 15, 2017

[4/14, 05:32] ‪+91 73875 17534‬: 💎🌐   *_विश्वरत्न ._*  🌐💎
🏳‍🌈 *_डाँ बाबासाहेब आंबेडकर ._*🏳‍🌈
💢 _यांचे प्रेरणादायी विचार._💢
🌾🌾 *K.*Ⓜ ®  🌾🌾
*तुमच्यात उर्जा, प्रेरणा, धाडस, आणि सत्यता निर्माण करणारी महामानवाची काही वाक्ये !!!*

*१) "शिका...! .*
*संघटीत व्हा...!.*
*संघर्ष करा....!"*
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

२) "तुमच्या मताची, किंमत मीठमिरची इतकी समजू नका. त्यातील सामर्थ्य ज्या दिवशी तुम्हाला कळेल तेव्हा ते, मत विकत घेऊ पाहणाऱ्याइतके कंगाल कोणीच नसेल..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

३) "लोकांच्या अंगात देवी, भुतच कां येतात..,
न्युटन आयझॅक, कोपर्निकस यांच्यासारखे शास्त्रज्ञ कां येत नाहीत...?
जेव्हा शास्त्रज्ञ अंगात येतील तेव्हा भारत जगावर राज्य करेल..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

४) "समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व या तीन तत्वावर आधारित जीवनमार्ग म्हणजे लोकशाही.
समता, स्वातंत्र्य, सहानुभूती यानेच व्यक्तीचा विकास होतो."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

५) "माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती आपल्या दुर्गुणांची...."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

६) "प्रज्ञा, शील, करुणा, विद्या, मैत्री या पंचतत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनविले पाहिजे..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

७) "मोठ्या गोष्टींचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

८) "जेथे एकता~
तेथेच सुरक्षितता"
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

९) "काम लवकर करावयाचे असेल, तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

१०) "दैवावर भरवसा ठेवून वागू नका, जे काम करावयाचे असेल ते आपल्या मनगटाच्या जोरावर करा..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

११) "आत्मोद्धार हा दुसर्याच्या कृपेने होत नसतो,
तो ज्याचा त्याने करायचा असतो..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

१२) "विचारक्रांती झाल्याशिवाय आचारात फेरबदल होवू शकत नाही.
आचारात फेरबदल करावयाचा झाल्यास आधी मनावर बसलेल्या जुन्या विचारांची छाप काढून टाकणे अगदी अगत्याचे आहे...."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

१३) " माणूस हा धर्मा करीता नसून, धर्म हा माणसा करिता आहे..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

१४) "सेवा जवळून, आदर दुरून, व् ज्ञान आतून असावे..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

१५) "जो प्रतिकूल लोकमताला घाबरून जात नाही,
दुसऱ्यांचे हातचे बाहुले न होण्याईतकी बुद्धी ठेवतात,
स्वाभिमान ज्याला आहे,
तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

१६) "स्वातंत्र्याचे हक्क भीक मागून मिळत नसतात,
ते स्व-सामर्थ्याने संपादन करावयाचे असतात,
देणगी म्हणून ते लाभत नसतात..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

१७) "ज्याप्रमाणे कोणत्याही राष्ट्राला दुसर्या राष्ट्रावर राज्य करण्याचा अधिकार नाही,
त्याचप्रमाणे, कोणत्याही एका विशिष्ट वर्गाला दूसर्या वर्गावर अधिसत्ता गाजविण्याचा अधिकार नाही..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

१८) "माझा जन्म सर्वसाधारण जनतेची जबाबदारी घेण्यासाठी असावा."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

१९) "तुम्ही आपली गुलामगिरी नष्ट करा.
स्वाभिमान शुन्यतेचे जीवन जगणे नामर्दपणाचे आहे."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

२०) "आपण मला देवपदाला चढवू नका. एखाद्या व्यक्तीला देवपदाला चढवून इतराने आंधळेपनाने त्याच्या मागे धावत जावे, हे मी तरी कमकुवतपनाचे लक्षण मानतो..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

२१) "माणसाने खावे जगण्या साठी,
पण जगावे समाजासाठी...."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

२२) "दुसर्याच्या सुख -दु:खात भागीदार व्हावयास शिकणे हेच खरे शिक्षण आहे..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

२३) "पती आणि पत्नी यांच्यातील संबंध जवळच्या मित्रांसारखे असावेत..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

२४) नाचुन मोठे होऊ नका तर,
वाचून मोठे व्हा.......!!
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

२५) माझ्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा
माझे अपुर्ण राहीलेले काम प्राणपणाने पुर्ण करा.....-
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

२६) जर तुमच्याकडे दोन नाणी असतील तर.एका नाण्याची भाकर घ्या आणि एका नाण्याचे पुस्तक घ्या...भाकर तुम्हाला जगविल..तर पुस्तक जगण्याची कला शिकवेल...
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

२७) "जुल्म करने वालों से जुल्म सहने वाला ज्यादा गुनहगार होता है"
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
[4/14, 08:38] Shendge Angad: *भारतीय घटनेचे शिल्पकार
#विश्वरत्न_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर....
यांच्या #१२६ व्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
*‘‘शिका ! संघटित व्हा !! संघर्ष करा !!’’*

#टोपणनाव :~ बाबासाहेब,
*#जन्म :~ एप्रिल १४, इ.स. १८९१*
     महू, इंदूर जिल्हा, मध्य प्रदेश
# *मृत्यू :~ डिसेंबर ६, इ.स. १९५६*
             दिल्ली, भारत
#पुरस्कार : ~ भारतरत्न (१९९०)
#वडील:~सुभेदार रामजी सकपाळ
#आई:~ भीमाबाई रामजी सकपाळ
#पत्नी नाव:~ रमाबाई आंबेडकर,
        डॉ. सविता आंबेडकर

 *●डॉ. भीमराव रामजी आंबेडकर●*
  *⟢⚞⚟⟢⚞⚟⟢⚞⚟⟢⟣⚞⚟⟢*
      🔹 हे जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडीत, समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, लेखक, प्राध्यापक, समाज सुधारक, बॅरीस्टर, वक्ते, पत्रकार, जलतज्ज्ञ, संपादक, स्वातंत्र्य सेनानी, संसदपटू, मानवी हक्कांचे कैवारी आणि बौद्ध धर्म पुनरुत्थानक होते. शिवाय ते भारत देशातील कोट्यवधी शोषित पददलितांचे उद्धारक आणि स्वतंत्र्य भारतीय संविधानाचे शिल्पकार होते.

    🔸ते बाबासाहेब या नावाने प्रसिद्ध आहेत. ‘बाबा’ म्हणजेच ‘पिता’ किंवा 'वडील' आणि ‘साहेब’ हा आदर व्यक्त करण्यासाठीचा शब्द आहे. सर्वप्रथम बाबासाहेबांच्या हयातीतच त्यांचे अनुयायी त्यांना ‘बाबासाहेब’ म्हणत असत, नंतरच्या काळात हेच नाव रूढ झाले आणि त्यांचे विरोधकही त्यांना बाबासाहेब संबोधू लागले. आज संपूर्ण भारत आणि विश्व त्यांना ‘बाबासाहेब’ संबोधीत आहे.

     🔹 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भीमा, भीम, भिवा, भीमराव, भीमराज, बाबा, बाबासाहेब इत्यादी नावांनी संबोधिले जाते. विश्वरत्न, विश्वमानव, विश्वभूषण, युगपुरूष, युगप्रवर्तक, महामानव, महापुरूष, उच्च विद्याविभूषीत, परोपकारी, क्रांतीसूर्य, प्रज्ञासूर्य, घटनासम्राट, घटनापती, बुद्धीसम्राट, समाजसूर्य, मसिहा, भारत भाग्यविधाता, महाविद्वान अशा अनेक उपाधींनी बाबासाहेबांना भारतीय जनते गौरविले आहे.
  *शैक्षणिक विचार*
   🔸शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्त्व समाजात विशद केले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही, असे ते समाज बांधवांना सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे सांगत. प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की, मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाली की, तो किंवा ती पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करूनच बाहेर पडावी. शासनाने यासाठी लक्ष द्यायला हवे त्यांचे म्हणणे हाेतेे की, समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या सशक्त होते.
      🔹पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापन १९४६ साली करुन त्यांनी मुंबईला सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरू केले. राष्ट्रहित व समाजहिताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय असे ते मानी.
   🔸डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ जातिव्यवस्थेच्या विरोधातच लढत होते असे नव्हे, किंवा ते केवळ विशिष्ट एका समाजाच्या विकासाचाच केवळ विचार करत होते असेही नव्हे. त्यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्याचेही भान होते. शिक्षण,  अंधश्रद्धा, स्त्रियांची स्थिती,अर्थकारण, राजकीय किंवा प्रशासकीय व्यवस्था या मुद्यांकडेही त्यांचे अवधान होते. बाबासाहेबांनी भारतातील सर्व समाजांचा आणि सर्वप्रथम देश हिताचाच विचार केलेला आहे. एकीकडे ते जसे १९३० ते ३२ मध्ये झालेल्या गोलमेज परिषदांतून अस्पृश्यांच्या न्याय व हक्कांसाठी लढतात तसेच दुसरीकडे ते भारतातील सर्व स्त्रीयांच्या उन्नतीसाठी विशेषत हिंदू समाजातील स्त्रियांना सामाजिक प्रतिष्ठा, संपत्तीतील हक्क,घटस्फोट इत्यादीबाबत स्वातंत्र्य मिळावे म्हणून हिंदू कोड बील संसदेत मांडतात आणि ते नामंजूर झाले म्हणून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामाही देतात. स्त्रीयांना त्यांचा अधिकार मिळत नाही यामुळे बाबासाहेबांनी मंत्रीपदाचा त्याग केला.

   🔸१९३० सालच्या लंडन मधील गोलमेज परिषदेच्या वेळी त्यांनी ब्रिटिशांना भारत सोडावा असे ठणकावून सांगितले होते. आपल्या पी.एचडी. च्या प्रबंधातूनही त्यांनी ब्रिटिशांनी भारताच्या चालवलेल्या आर्थिक शोषणाचे विश्र्लेषण केले होते.

   ६ डिसेंबर १९५६ रोजी पहाटे १२.१५ वाजता दिल्लीला निवासस्थानी त्यांचे महापरिनिर्वाण (निधन) झाले. ७ डिसेंबर १९५६ रोजी सायंकाळी ७.५० वाजता त्यांच्यावर मुंबई मध्ये बौद्ध पद्धतींनी अंत्यसंस्कार करण्यात आले.

   🔸बोधिसत्व घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध बनून केवळ सातच आठवडे झाले होते, तरीसुद्धा त्या अल्पशा काळात बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी सम्राट अशोकनंतर त्यांनी अन्य कोणाही भारतीयापेक्षा सर्वात अधिक कार्य केले होते.
    ──┅━━═▣✧▣═━━┅─
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

➖➖➖➖➖➖➖➖➖

मला या देशाची राज्यघटना लिहीतानी कोणतीही अडचण नाही आली कारण माझ्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांच स्वराज्य उभा होतं.
-भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर
➖➖➖➖➖➖➖➖➖
शिक्षण हे वाघिनीचे दूध आहे
जो पिल तो गुरगुरल्याशिवाय
राहणार नाही.....

 शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा...
*डॉ.भीमराव रामजी आंबेडकर*
➖➖➖➖➖➖➖➖➖
नाचुन मोठे होऊ नका तर,
वाचून मोठे व्हा॥
माझ्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा
माझे अपुर्ण राहीलेले काम प्राणपणाने पुर्ण करा॥
जर तुमच्याकडे दोन नाणी असतील तर. एका नाण्याची भाकर घ्या आणि एका नाण्याचे पुस्तक घ्या॥
भाकर तुम्हाला जगविल, तर पुस्तक जगण्याची कला शिकवेल॥
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
➖➖➖➖➖➖➖➖➖
"दुसर्याच्या सुख -दु:खात भागीदार व्हावयास शिकणे हेच खरे शिक्षण आहे..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*
➖➖➖➖➖
🖊* 🖊
स्वामी विवेकानंद म्हणतात:
"माझा देश हा बिन डोक्याचा बाजार आहे, इथे चटणी कोरडी खातील, अन तेल दगडावर ओततील, नारळातील चवदार, पोषक जल गटारीत, अन नदीतील गटारजल पवित्र म्हणुन स्वतः पितील", चादरी दगडावर चढवतील अन माणसाला उघड ठेवतिल.. "परिवर्तनाच्या चळवळीत काम करायला भिणारी माणसे जिवंतपणी मेलेली असतात , तर चळवळीत काम करणारी माणसे मेल्यानंतर सुद्धा जिवंत राहतात".."लोकांच्या अंगात देवी, भुतंच का येतात शिवाजी महाराज, सम्राट अशोक, सावित्री बाई फुले, न्युटन आयझॅक, यांच्यासारखे विचारवंत का येत नाहीत? जेंव्हा विचारवंत अंगात येतील तेंव्हा भारत जगावर राज्य करेल"..

- स्वामी विवेकानंद

बाबासाहेब अम्बेडकर विचार

बाबासाहेबांनी देशासाठी केलेल्या विशाल कार्यांपैकी काही महत्वाचे मुद्दे :~

१. भारत देशाची ३९५ कलम, ८ परिशिष्ट व २२ भागाची राज्यघटना लिहून जगातील संसदिय लोकशाहीचे पुनरुज्जीवन केले.

२. राज्यघटनेने सर्वांना मुलभूत हक्क, अधिकार दिले.
तसेच कर्तव्य सुद्धा नमूद केले.

याबरोबरच "डायरेक्टीव्ह प्रिन्सिपल" देवून सरकारच्या जबाबदाऱ्यांची तरतूद केली.

३. राज्यघटने मुळे सामाजिक व भौगोलिकदृष्ट्या भिन्न असलेल्या देशाला एक केले .

४. भारताच्या प्रत्येक नागरीकाला मतदानाचा अधिकार दिला.

५. प्रौढ मतदानाचा (२१ वर्षांवरील) प्रत्येक नागरिकाला अधिकार देवून जगातील प्रथमच प्रयोग केला.

६. भारतात प्रथम अर्थशास्त्राचा पाया रचला. "रिजर्व बँक ऑफ इंडिया"च्या स्थापनेचा पाया रचला.

७. संविधान लिहून स्त्रीयांना शिक्षणाचा अधिकार दिला.
स्त्रीयांना नोकरी करण्याचा अधिकार दिला.
अन्यथा देशातील महिला आजही "चूल आणि मुल" सांभाळत बसल्या असत्या.

८. स्त्रीयांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क मिळवून दिले.
त्यांच्या हक्क व अधिकारासाठी हिंदू कोड बिल संसदेत मांडले.

हिंदू कोड बिल मंजूर नाही झाले म्हणून मंत्रिमंडळातून मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

९. नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी गर्भावस्था काळात ६ महिन्याच्या भरपगारी रजेची तरतूद केली.
(*जगात अशी तरतूद करणारे भारत हे पहिले राष्ट्र आहे.*)

१०. स्त्रीयांना (मुलींना) वडीलांच्या चल-अचल संपत्तीवर मुलांच्या इतकाच (पुरुषांसारखाच) समान अधिकार मिळवून दिला.

११. पुरुषांना एकपत्नित्व अधिकार...
दुसरी पत्नी असेल तर पत्नीला पतीच्या संपत्तीमध्ये हिस्सा मागण्याचा अधिकार मिळवून दिला.

१२. नियोजन आयोगाची स्थापना केली.

१३. पंचवार्षिक योजनांची सुरुवात केली.

१४. भारतात प्रथम जलनिती तयार केली व "नद्या जोडणी प्रकल्प" आखला पण राजकिय इच्छाशक्तीच्या अभावामुळे त्याची अंमलबजावणी झालेली नाही
आणि
त्यामुळे या देशात काही भागात पूरसदृश परिस्थिती व काही भागात पाण्याअभावी शेतकरी आत्महत्या करत आहेत.

१५. भाकरा नांगल, दामोदर धरण, सोनाकुड, हिराकूंड धरण प्रकल्पाचे उदगाते...

१६. 'कोसी नदीवर धरण बांधा त्यामुळे बिहारमध्ये कधीच पूर येणार नाही’
हे सुद्धा त्यांनीच सांगितले.

१७. भारतात प्रथम परिवार नियोजनाचा नारा दिला.

१८. भारतात बालमजुरीवर रोख लावली.

१९. कोलंबीया विद्यापीठात असताना
३ वर्षात २९ अभ्यासक्रम (११ इतिहास,
६ समाजशास्त्र,
५ तत्त्वज्ञान,
४ मानववंशशास्त्र,
३ राजकारणाचे)
करणारा पहिला आणि शेवटचा व्यक्ती...

२०. मजुरांना १२ तास काम करावे लागायचे, त्यासाठी ८ तास ड्युटी व आठवड्यातून एक सुट्टी कायदा केला.

२१.  ८ तासापेक्षा जास्त काम केल्यास, कामाचा मोबदला (ओवरटाईम) प्रावधान लागू केले.

२२. ‘खोत बिल’ आणून सावकारी आणि वेठबिगारीचा अंत केला.

२३. भारताला उच्च-नीच जातीवादातून मुक्त केले...

नाहीतर चांभाराच्या मुलांनी चांभारकी,
लोहाराने लोहारकी,
सोनाराने सोनारकी, मराठ्याने शेती,
ब्राह्मणाने शिक्षण घ्यावे व पुजारी बनावे...

असे करावे लागे
पण, बाबासाहेबांच्या योगदानाने आज कोणत्याही जातितील मुले डॉक्टर, इंजीनियर, वकील, IAS, IPS, मोठमोठे अधिकारी होवू शकतात...

२४. देशातील ८०% जनतेला जिला आजपर्यंत क्षुद्र, अस्पृश्य म्हणून सर्व अधिकारांपासून हिणवण्यात आले, अत्याचार सहन करावे लागत होते,
त्यांना समान अधिकार मिळवून दिले

मानवमुक्तीचा आदर्श रचला...

२५. रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण योगदान.

२६. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात महत्वपूर्ण योगदान...

२७. “मुंबई हि फक्त महाराष्ट्राचीच आहे आणि ती मिळवून देण्यासाठी मी माझ्या अंतापर्यंत लढेन” अशी घोषणा केली...

२८. "मजुरमंत्री" असतांना विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना आणली.

२९. उर्जानिर्मिती व्यवस्थापनासाठी ‘सेन्ट्रल टेक्निकल पावर बोर्ड (CTPB) ची स्थापना केली.

३०. देशात प्रथमच पाटबंधारे आणि सिंचन आयोगाची स्थापना केली.

३१.पाण्याच्या व्यवस्थापना साठी नैसर्गिक संसाधन व कोळसा आयोगाची स्थापना केली...

३२. शेती, उद्योग~कारखाने यांच्या विकासासाठी RCC (रिकन्स्ट्रक्शन कमिटी कौन्सिलची स्थापना केली)

३३. बिहार, मध्यप्रदेशाचे विकास व्हावे यासाठी विभाजन करावे अशी सूचना मांडली.

आज ४५ वर्षांनंतर छत्तीसगढ आणि झारखंड राज्य निर्माण झाले...

३४. शिक्षक भारताच्या मणक्याचा कणा आहे त्याला योग्य वेतन द्यावे यासाठी योगदान..

३५. स्त्रीभ्रूण हत्त्या विरोध, व गर्भपात करू नये यासाठी जनजागृती...

३६. देशाला उपराजधानी ची गरज आहे हे सांगणारे प्रथम व्यक्ती...

३७. देशात कोळसा ऊर्जेपेक्षा सौर ऊर्जेपासून चालणारे जल विद्युत प्रकल्प उभे करावेत हे सांगणारे प्रथम व्यक्ती जे अजूनही झालेले नाही...

३८. ‘मी कायदेमंत्री बनण्यापेक्षा मी कृषिमंत्री होउन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईन व देशात शेतीचा विकास करून शेतकऱ्यांचे राज्य प्रस्थापित करेन’ असे विधान करणारे सुद्धा बाबासाहेबच...

३९. बाळ गंगाधर टिळक यांच्या मुलाने आत्महत्या केली,
त्या वेळेस भविष्यात कोणी आत्महत्या करू नये म्हणून भावपूर्ण लेख लिहून त्याला आदरांजली दिली व कायदा मजबूत केला.

४०. तीन लष्कर प्रमुख कधीच एकत्र येवून देशविरोधी कृत्य करून नये हे सांगून तशी मांडणी केली.

४१. एकमात्र भारतीय ज्यांना ब्रीटीशांकडून गोलमेज परिषदेला येण्याचे विशेष निमंत्रण दिले जायचे.

४२. *एकमात्र असे व पहिले भारतीय नेता ज्यांनी स्त्रिया, ओबीसी व एसटी प्रवर्गासाठी असलेले बिल पास न झाल्यामुळे मंत्रीपदाचा राजीनामा दिला...*

४३. बाबासाहेब देशातील पहिले उच्चशिक्षित अर्थशास्त्री आहेत.

४४. ते एक चांगले वायोलिन वादक, शिल्पकार व चित्रकार सुद्धा होते...

४५. त्यांचे एकूण ९ भाषांवर प्रभुत्व होते. इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराती, पारसी, संस्कृत, जर्मन, फ्रेंच, व पाली.

४६. त्यांनी पाली भाषेवर इतके प्रभुत्व मिळविले कि पाली व्याकरण व शब्दकोशाची सुद्धा निर्मिती केली...

४७. त्यांनी संसदेत मांडलेली महत्वाची विधेयके : ~
महार वतन बिल,
हिंदू कोड बिल,
जनप्रतिनिधी बिल,
खोत बिल,
मंत्र्यांचे वेतन बिल,
रोजगार विनिमय सेवा,
पेंशन बिल,
भविष्य निर्वाह निधी (पी एफ) बिल इ.

४८. मराठी हि राजभाषा व्हावी यासाठी संसदेत मत मांडले...

४९. पाण्यासाठी आंदोलन करणारे (महाड सत्याग्रह) जगात पहिले व्यक्ती...

५०. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये सर्वात जास्त पुस्तके वाचणारे पहिले व शेवटचे व्यक्ती....

५१. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून डी. एस. सी. पदवी मिळवणारे प्रथम व शेवटचे भारतीय...

५२. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये आठ वर्षांचा अभ्यासक्रम ३ वर्षात करणारे जगातीन प्रथम व शेवटचे व्यक्ती, ते सुद्धा भारतीय...

५३. देशात भविष्य निर्वाह निधी (पी. एफ.) कायदा आणून कामगारांच्या हक्काचे संरक्षण केले.

५४. देशातील जनतेला वैयक्तिक आयुर्विमा घेण्यासाठी आयुर्विमा महामंडळाची स्थापना करण्यासाठी कार्य केले..

५५. देशात इम्प्लॉयमेंट एक्स्चेंजची निर्मिती केली व सर्व समाजातील बेरोजगारांना नोकरीचे दरवाजे खुले केले...

५६. अन्याय, अत्याचारा विरोधात आवाज उठविण्यासाठी एक कुशल पत्रकार म्हणून
मूकनायक,
बहिष्कृत भारत,
प्रबुद्ध भारत

जनता
पाक्षिक-साप्ताहिक सुरु केले...

५७. 'बहिष्कृत हितकारणी सभे'ची स्थापना करून जातींअंताची चळवळ सुरु केली.

५८. दुसऱ्या गोलमेज परिषदेत अस्पृष्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले...

५९. अल्पसंख्यांका विरोधात कॉंग्रेस च्या धोरणाला गोलमेज परिषदेत विरोध...

६०. बहुजनांसाठी मो.क. गांधी यांच्याशी वैचारिक संघर्ष करून पुणे करार केला...

६१. बहुजनांच्या राजकीय, सामाजिक हक्कांसाठी कॉंग्रेस पक्षाशी संघर्ष केला...

६२. राज्यघटना बनविण्यापूर्वी,
१९३४ साली घटनात्मक दुरुस्ती करता निर्माण करण्यात आलेल्या पार्लमेंटरी कमिटीचे सन्माननीय सदस्य...

६३. हिंदू धर्मातील चातुर्वर्ण्य पद्धती, विषमता व अन्याय-अत्याचाराला कंटाळून १९३५ साली येवला येथे भरलेल्या परिषदेमध्ये
‘मी हिंदू म्हणून जरी जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही’ अशी घोषणा केली...

६४. हिंदूंसाठी काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह केला...

६५. “UNTOUCHABILIT”  हा शब्द बाबासाहेबांच्या लिखाणातून *इंग्रजी भाषेत* घेण्यात आला....

६६. भारताचे पहिले कायदेमंत्री होण्याचा बहुमान...

६७. त्यांनी स्थापन केलेल्या संघटना :

बहिष्कृत हितकारणी सभा,
ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन,
दि बॉम्बे म्यूनिसिपल लेबर युनियन इ.

६८.पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना ...

६९. सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स आणि इकोनॉमिक्स ची स्थापना.

७०. सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ ची स्थापना...

७१. बुद्ध धम्माच्या प्रचार- प्रसारासाठी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ची स्थापना केली....

७२. औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना...

७३. भारताच्या राष्ट्रीय ध्वजाच्या मध्यभागी ‘अशोक चक्र’ असण्याला संसदेत मान्यता मिळवून दिली...

७४. भारताला राष्ट्रीय चिन्ह “अशोक चिन्ह” मिळवून दिले जे बुद्ध धम्मचक्र आहे....

७५. बुद्ध धम्माचे प्रतिक निळ्या रंगाला राष्ट्रीय रंग, धम्माचे प्रतिक कमळ फुलाला राष्ट्रीय फुल, बोधिवृक्ष (पिंपळ)
राष्ट्रीयवृक्ष राष्ट्रीय प्रतीके मिळवून दिली....

७६. ‘सत्यमेव जयते’ सम्राट अशोक कालीन ब्रीदवाक्य भारताचे ब्रीदवाक्य म्हणून पुनरुज्जीवित केले...

७७. राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष म्हणून त्याच्या सन्मानाच्या निरन्तरतेसाठी कायदा बनविला...

७८. भारत देशाला तिरंगा व त्याच्या मधोमध अशोकचक्र अशी अनोखी भेट दिली...

७९. त्यांना मिळालेल्या उपाध्या (सन्मान) : ~

⚜भारतरत्न (भारत सरकार),

⚜द ग्रेटेस्ट मँन इन द वर्ल्ड (कोलंबिया विद्यापीठ),

⚜द युनिवर्स मेकर (ऑक्सफर्ड विद्यापीठ),

⚜द ग्रेटेस्ट इंडियन (CNN IBN व History वृत्त वाहिनी) इ.
असे बरेच सन्मान मिळाले...

८०. एकमात्र भारतीय ज्यांनी पुस्तकांसाठी एक घर बनवले....

८१. विश्वातील एकमात्र व्यक्ती ज्यांच्याकडे ५०,००० पेक्षा जास्त पुस्तके/ ग्रंथ संच आहेत...

८२. महापुरुष इतिहास घडवतात पण हे असे आहेत कि ज्यांनी ५००० वर्षांचा विषमतावादी, रूढी परम्परांनी वेढलेला इतिहास बदलला...

८३. पाकिस्तान मध्ये एका भारतीयाची जयंती साजरी होते ती व्यक्ती म्हणजे बाबासाहेब....

८४. बाबासाहेब एक महान अर्थशास्त्री,
समाजशास्त्री,
विधिज्ञ,
राज्यघटनाकार,
आधुनिक भारताचे जनक,
इतिहासाचे गाढे अभ्यासक व स्वतः घडविणारे सुद्धा,
मानववंशशास्त्र अभ्यासक,
पाली साहित्याचे महान अभ्यासक,
बौद्ध साहित्याचे महान अभ्यासक “बोधिसत्व”,
महान तत्त्ववेत्ते,
निष्णात राजकारणी, दीन-दलित-महिला-मजूर यांचे उद्धारक,
विज्ञानवादी शोधाचे समर्थक,
संस्कृत व हिंदू तसेच इतर सर्व प्रचलित धर्मांचे गाढे अभ्यासक
होते....

⚜💎🕯📚🕯💎⚜

वरील सर्व मुद्यांव्यतीरीक्त बरीच मोठी यादी आहे
पण,
वेळेचे व जागेचे भान ठेवून इतकेच लिहित आहे.

वाचल्यानंतर एक मात्र सांगाल कि,
“आधुनिक भारत देशाचा निर्माता” (NATION BUILDER) हे एकच...
ते म्हणजे विश्वरत्न, बोधिसत्व प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर.....
💐💐💐💐💐JAIBHIM💐💐💐💐💐💐बाबासाहेबांच या देशाला सगळ्यात मोठ योगदान हे भारतीय संविधान आहे. तसेच जे बर्याच जणांना माहीत आहे व ज्यांना नाहीत हे खालील प्रमाणे:

कामगारांना मिळणार्या प्राथमीक सेवा ह्या फक्त बाबासाहेबांमुळे शक्य झाल्या.
*रोजगार बदली- Employment Exchange*
*बाबासाहेब*

*कामगार राज्य विमा- Employees State Insurance-ESI*
*बाबासाहेब*

*कामाचे तास: १२ तासाचे ८ तास- Working Hours 12 Hrs to 8 Hrs*
*बाबासाहेब*

*कामगार संघटनेची मान्यता- Compulsory Recognition for Trade of Union*
*बाबासाहेब*

*महागाई भत्ता- Dearness Allowance-DA*
*बाबासाहेब*

*पगारी सुट्ट्या- Paid Holidays*
*बाबासाहेब*

*आरोग्य विमा- Health Insurance*
*बाबासाहेब*

*कायदेशीर संप अधीकार- Legal Strike Act*
*बाबासाहेब*

*निर्वाह निधी- Provident Fund-PF*
*बाबासाहेब*


*कामगार कल्यान निधी- Labour Welfare Fund*
*बाबासाहेब*

*तांत्रिक प्रशिक्षण योजना- Technical Training Scheme*
*बाबासाहेब*

महत्वाचे देशाला विकसीत करुण प्रगतीकडे नेणारे कार्य:
आजच्या भ्रष्टाचारी नेत्यांना लाजवेल असे
*मध्यवर्तीय जलसिंचन आयोग- Central Irrigation Commission*
*बाबासाहेब*

*अर्थव्यवस्थेची तरतुद- Provision of Finance Commission*
*बाबासाहेब*

*मतदानाचा अधीकार- Right to Vote*
*बाबासाहेब*

*भारतीय सांखीकीक कायदा- Indian Statistical Law*
*बाबासाहेब*

*मध्यवर्ती विद्युत तांत्रिक समीती- Central Technical Power Board*
*बाबासाहेब*

*हिराकुड धरण- Hirakud Dam*
*बाबासाहेब*

*दामोदर खोरे प्रकल्प- Damodar Valley Project*
*बाबासाहेब*

*ओरीसा नदी- Orissa River*
 *बाबासाहेब*

*भाक्रा-नानगल धरण- Bhakra-Nangal Dam*
*बाबासाहेब*

*सोने नदी प्रकल्प- The Sone River Valley Project*
*बाबासाहेब*

*भारतीय रिझर्व बँक- Reserve Bank of India*
*बाबासाहेब*

*राज्य विभागणी आयोग- State Division Commission*
*बाबासाहेब*

*विद्युत-जोड प्रकल्प- Power Grid System*
*बाबासाहेब*

*नदी जोड प्रकल्प- River Grid System*
*बाबासाहेब*

स्पेशीयल महीलांसाठीच्या ऊन्नती साठी केलेले कार्य:
ज्या आज स्वाभीमानाचं जिवन जगत आहेत.
*पालकत्वाचा अधीकार- Right to Guardianship*
*बाबासाहेब*

*मालमत्तेचा अधीकार- Right to Property*
*बाबासाहेब*

*फार्कतीचा अधीकार- Right to Divorce*
*बाबासाहेब*

*प्रसूती पगारी रजा- Pregnancy Leave/Maternity Benefit Act*
*बाबासाहेब*

*ना स्त्रि..ना पुरुष*
*समान कामाला समान पगार- Equal Pay for Equal Work*
*बाबासाहेब*

*महिला कामगार संरक्षण कायदा- Women Labor Protection Act*
*बाबासाहेब*

Ref:
*https://www.quora.com/Is-Ambedkar-the-founding-father-of-modern-India*

*Lets Salute to the First Greatest Indian, The Real Architech of India, The Father of Indian Constitution, Father of Economy,Bodhisatva, Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar..Jay Bhim-#SK_BLUE*

Sunday, April 9, 2017

BMC ब्लॉग

     सर्व ब्लॉग आणि सर्व  शैक्षणिक माहिती एकाच ब्लॉग वर उपलब्ध                  https://bmcschools.blogspot.in/

Friday, April 7, 2017

मंथन

नक्की वाचा डोळ्यातुन पाणी आल्या वाचुन राहनार नाही .
एकदा वाचा फक्त
2 मिनिट लागतील...

" ओळख " ..
या नावाचा पाठ पुढच्या वर्षी
इ.7 वी ला असणार आहे,
त्याचा हा संदर्भ ..

नगर जिल्ह्यात दुर्गम भागात
अकोले येथील एका
प्राथमिक शाळेत एक शिक्षक
काही दिवसापुर्वीच रुजू झाले.

शाळेच्या पहिल्याच दिवशी
शिक्षक खूप घाबरलेले,
गांव कसं असेल, तेथील पोरं
कशी असतील,
सहकारी कसे असतील, असे
नाना विचार त्याच्या डोक्यात
येत होते .....

शाळेची वेळ झाली शिक्षक शाळेत
हजर झाले मुख्याध्यापक म्हणाले,
गुरुजी तुम्हांला त्या कोप-यात
असलेल्या वर्गावर जायचे आहे.

 ..शिक्षकाला थोडं अवाक वाटलं,
शेवटचा अन् तोही कोप-यातला
वर्ग ? शिक्षक नाइलाजास्तव त्या
वर्गात गेले ....

पाहिलं, तर काय, सर्व मुलांनी
नवीन गुरुजींच्या स्वागतासाठी
फूलं आणून ठेवलेली...

टाळ्यांच्या गजरात मुलांनी
गुरुजींचे स्वागत केले ..

वर्गातील पट सतरा,
सर्व मुलं हजर,
एकदम टापटिप ...

पाहून शिक्षकाला बरं वाटलं,
पूर्वी मनात असलेल्या शंका
कुठे नाहिशा झाल्या,
कळलेच नाही.

त्याच शाळेतील एक शिक्षिका
आपल्या लहान दोन वर्षाच्या
बाळाला रोज शाळेत
आणत असत. ते इवलंस,
गोंडस मूल दिवसभर
या वर्गात, त्या वर्गात फिरत असे.

या नवीन आलेल्या
गुरुजींच्या वर्गात ते मूल
रोज भेट देत असे,
त्याचीही सवय सर्व शाळेला
झालेली होती ...

एक दिवस ते बाळ
शाळेत आलं, मात्र,
या नवीन आलेल्या
गुरुजीच्या वर्गात,
मात्र आल नाही ...

गुरुजी त्याची
वाट पाहत होते,
बराच वेळ झाला,
मूल काही आल नाही,

आता गुरुजीलाच वाटलं
आपणच जाऊन,
त्याला भेटून यावं,
लगबगीने गुरुजी उठले,
त्या बाईंच्या वर्गात गेले,

पाहिलं तर मूल तिथंही नव्हतं,
बाई म्हटल्या "गुरुजी बाळ तर
तुमच्याच कडे आलंय,
कुठं गेलं असेल ते "?

आख्खी शाळा त्या बाळाला
शोधत होती. सगळा परिसर
पिंजून काढला. बाळ मात्र,
कुणालाच गवसलं नाही.

त्याच्या आईने आक्रोश केला.
बाळ गेलं कुठं कुणालाच कळेना.
..गुरुजी शांत मनाने विचार करत
शाळेच्या झेंड्याला टेकून बसले.
सर्व वातावरण नि :शब्द झालं. अचानक, सर्व शाळेवर दु:खाचं
सावट पसरलं.

गुरुजी कुणालाही न सांगता
शाळेच्या मागे अर्धवट बांधलेल्या
पाण्याच्या टाकिकडे गेले,
आंत डोकावुन पाहिलं ...

पाहतांच त्यांचं अवसानच गळालं,
मनात आलेली शंका खरी ठरली
होती. बाळ आंत पडून गुदमरुन
अंत्यस्थ झालं होतं.

आईच्या दु:खाला सिमाच नव्हती.
एकुलतं एक मूल आज थोड्याशा
दुर्लक्षामुळे हातचं गेलं होतं.

सर्व गांव शाळेत जमा झालं.
बाळाच्या बापाला निरोप पाठवला.
तोवर आईने निर्णय घेतला,
बाळाच्या अंत्यविधिचा. सर्वांना आश्चर्य वाटलं. आईची इच्छा,
म्हणून बाळाच्या अंत्ययात्रेला
सुरुवात झाली. आई देखील
त्या बाळाच्या सोबत होती.

चालताना आई मात्र आपल्या
घड्याळाकडे पाहत होती.
कुणालाच काही कळेना,
बाई असं कां करताय.

अंत्ययात्रा स्मशानात जाऊन
पोहचली. लोकांनी त्या बाळाला
पुरायला सुरुवात केली, तोच
आईने जोरात आवाज दिला,
"थांबा " सगळ्यांना वाटलं,

कदाचित मुलाचा बाप
येत असेल, पण तसंही नव्हतं.
थोडा वेळ आईने
बाळाला निरखून पाहिलं आणि..

काही क्षणांतच वैध्यकीय पथक
तिथं दाखल झालं... आईला बरं वाटलं. त्या पथकाने बाळाचे डोळे यशस्वीरित्या काढले आणि..
परत गेले.
आईने जन्मतांच बाळाचे डोळे
दान केले होते आणि ते डोळे दान
करण्यासाठी ती थांबून होती.
बाळाचं शेवटचं दर्शन तिनं घेतलं,
बाळाला मुठमाती दिली,
जो तो आपआपल्या घरी
निघुन गेला.

या घटनेला दोन तन वर्ष झाली.
आता त्या बाळाला सगळेच विसरले
होते. बाळ आता विस्मृतीत
जमा झालेलं होतं.

एके दिवशी त्या बाई त्यांच्या
नवऱ्यासोबत गावाला जायचं,
म्हणून नगरच्या बसस्टॅंडवर
बसले होते. अचानक तिच्या
डोळ्यातून अश्रु येऊ लागले,
बाई हंबरडा फोडून रडू लागली.
तिच्या नवऱ्यालााही
कळत नव्हतं काय झालं.

सगळी गर्दी जमा झाली.
डेपो मॅनेजरही आले ..
बाईला विचारलं काय झालं ..??
बाई जोरात नवऱ्याला
घट्ट बिलगून म्हणाल्या...

"आपल बाळ जिवंत आहे "
काही क्षणापूर्वी एका बसमधे
बसलेलं पाच सहा वर्षाचं बाळ
तिच्याकडे एक टक पाहत होतं.

त्या बाळाच्याही डोळ्यातून
अचानक अश्रु आले होते.
त्याच्या डोळ्यांनी
तिला ओळखलं होतं..

तिलाही ते डोळे पाहिल्याचा
भास झाला आणि आपल्या
बाळाची आठवण आली ..

डेपो मॅनेजरला
सगळा प्रकार कळला.
त्याने ती बस फोन करुन
पुढच्या स्टाँपवर थांबवली.

चौकशी केली तर,
त्या बाळाचे डोळे,
त्या बसमधील बाळाला
3 वर्षापूर्वी यशस्वीरित्या
प्रत्यारोपण केले होते ...

ते डोळे अजूनही
त्या आईला
ओळखत होते....
🙏🏽🌹🙏🏽🌹🙏🏽🌹🙏🏽🌹🙏🏽

साखर

साखर तयार करण्याचा सर्वांत पहिला कारखाना भारतात इंग्रजांनी सन १८६८ मध्ये सुरु केला. "त्याआधी भारतीय लोकं शुद्ध देशी गुळाचेच सेवन करत होते आणि कधीही आजारी पडत नव्हते."*

साखर हे एक प्रकारचे विष आहे जे अनेक रोगांना निमित्त ठरते . हे कसे काय  घडते याबद्दल आपण जरा माहिती घेऊ या...
ⓐⓡⓐ
(१) --  साखर बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये गंधकाचा सर्वाधिक वापर केला जातो. गंधक म्हणजे काय तर फटाक्यांमधील मसाला!
ⓐⓡⓐ
(२) -- गंधक हा अत्यंत जड धातू असून एकदा का गंधक शरीरात गेले की ते शरीराबाहेर पडतच नाही.
ⓐⓡⓐ
(३) -- साखर ही कॉलेस्ट्रॉल वाढवते. कॉलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो.
ⓐⓡⓐ
(४) -- साखरेमुळे शरीराचे वजन अनियंत्रित वाढते व त्यामुळे अंगी स्थूलपणा येतो.
ⓐⓡⓐ
(५) -- साखर ही रक्तदाब वाढवते.
ⓐⓡⓐ
(६) -- साखर ही मेंदूला झटका येण्याचे एक मुख्य कारण आहे.
ⓐⓡⓐ
(७) -- साखरेतील गोडपणाला आधुनिक चिकित्सा पद्धतीत सुक्रोज म्हटले जाते. माणसे व जनावरे हे दोघेही सुक्रोज पचवू शकत नाहीत.
ⓐⓡⓐ
(८)-- साखर तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये तेवीस हानीकारक रसायने वापरली जातात.
ⓐⓡⓐ
(९)--  साखर ही मधुमेह होण्याचे एक मुख्य कारण आहे.
ⓐⓡⓐ
(१०) -- साखर हे पोटातील जळजळीचे एक मुख्य कारण आहे.
ⓐⓡⓐ
(११) -- साखर ही शरीरातील ट्राइ ग्लिसराइड वाढवते.
ⓐⓡⓐ
(१२) --  साखर हे पेरेलिसिसचा झटका अथवा लकवा होण्याचे एक मुख्य कारण आहे.
ⓐⓡⓐ
(१३) कृपया आपणास जितके शक्य होईल तितके साखर सोडून गुळाचा वापर करणे सुरू करा.

वरील हितकारक माहिती आपल्या ओळखीची लोकं, आपले मित्र, नातेवाईक आणि इतर गटांना अवश्य पाठवा.
--------*****----*****-----*****-----

Monday, April 3, 2017

राज्यातील सर्व शाळा १५ जुन पासूनच सुरु होणार -शिक्षणमंत्री विनोद तावडे 
*दिखावा एक सोंग-नाटक* अवश्यवाचा
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐✍गावाच्या वस्ती मधील स्मशानभूमीत प्रेत एकटेच जळत होते .....
ते पाहून असंख्य प्रश्नांनी अर्जुनाच्या मनात एकच गदारोळ उत्पन्न केला होता.
      हेच ते प्रेत जीवंत असताना.....
माझे -माझे करत असेल, एक एक रुपया साठी झगडत असेल,
मोह -माया- काम- क्रोध- मत्सर यांना घेऊन समाजात जगत असेल,आरे ला कारे करणारा देह ,आज मात्र जळतोय शांत, स्तब्ध,एकाकी.......
तरीही  शांतपणे पडून स्वतःला जाळून घेतोय..............
जीवलगांनी त्यांच्यासाठी जीव  लावला. ते आज ओक्साबोक्षी रडले. घरा पासुन स्मशानभुमी पर्यंतच---- सोबती झाले-खरे;परंतु विधि संपताच त्यांनी घराचा रस्ता धरला.घरी जाऊन त्यांनी सुद्धा कडू घास काढण्यासाठी दोन चार घास पोटात घातले असतील, आज दोन चारघास पण उद्या पासुन पोटभर अन्न खातील ते.
जमवलेल्या लाखो रूपयाच्या संपत्ती पैकी फुटका रूपया मुखात आलाय, जीवनात 100 एकर जमीनीच्या तुकड्याला खरेदी केले, तरीही जाळायला नेले स्मशान भुमीतील एकाकी घाटावर,
अलिशान बंगल्यामध्ये छानसा सुंदर तयार केलेला बाथरूम, तरीही शेवटची अंघोळ ही त्यात नव्हती, तर ती होती फक्त आणि फक्त घरा समोरील रस्त्यावर...
आयुष्यभर ज्या साठी झगडला,त्यातील एक गोष्ट सुध्दा  बरोबर नव्हती.
जळतांना - ना प्रेम करणारे जीवलग, ना नातेवाईक, ना सगे सोयरे,ना करोडोची संपत्ती......अरे..अरे.sss
तरीही तो आयुष्यभर खोट्या गोष्टीचा मोह धरून पळत राहिला. ही खंत तर नसेल वाटत त्या जळणा-या  प्रेताला  !!!!!!!!
     समाज बंधुंनो  !
*आत्मप्रौढी, स्वत:चा मोठेपणा, दुस-याबाबत आकस, समोरच्याला कमी लेखनाची हीन मनोवृत्ती, रावणाच्या गर्वाची भाषा, अहंपणाचा महामेरू ही जीवनातील -हासाची कारणे सोबत असतील तर जीवन कदापी सुंदर होणार नाही*
     चला, जीवन सुंदर बनविण्यासाठी काम-क्रोध-लोभ-मत्सररूपी लक्षणांना दुर ठेऊन जीवनात किती ही मोठेपद,प्रतिष्ठा, यश मिळाले तरी अहंकार रूपी सैतनानाला दुर ठेऊ या.
*विचार जोडु या,समाज जोडु या,  समाजात खरे प्रबोधन घडऊ या*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Sunday, April 2, 2017

जिंदगी


विरहानं प्रेम वाढतं हे खरं असलं, तरी ते प्रेम व्यक्त करायला पुन्हा भेटायची संधी जर मिळाली तरच अर्थ आहे ना? पण विरहाचं रुपांतर वियोगातच झालं, तर हळहळणं आणि उरलेलं आयुष्य मनस्तापात, दु:खात घालवणं याशिवाय पर्यायच राहणार नाही, नाही का?

माझ्या अगदी परिचयातला एक जण असाच हळहळत असतो. कुठल्याही हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर त्याला वडिलांची आठवण होते. ते म्हणाले होते, ' मला एकदा हॉटेलमध्ये डोसा खायचा आहे रे ...'

' जाऊया की मग ... त्यात काय? उद्याच नेतो तुम्हाला.. ' असं आश्वासन देऊन तो बाहेर गेला आणि तो ' उद्या ' आयुष्यात कधी उगवलाच नाही. कारण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्याच रात्री वडिलांना हार्ट अॅटॅक! आणि जगाचा निरोप!

 मुंबईत ताज-ओबेरॉयचा अतिरेकी हल्ला काय किंवा रेल्वेमध्ये झालेले बॉम्बस्फोट काय ... कितीतरी जणांचे 'उद्या' गिळंकृत करून गेले आणि वेदनांचे डंख जगणाऱ्यांसाठी ठेवून गेले.

पेपरमध्ये त्यांच्या करुण कहाण्या छापून आल्या, तेव्हा कुणी आई म्हणत होती 'अभ्यास करत नाही चांगला, म्हणून रागवायचे मी त्याला ... आता ...?' ' नेहमी भांडायचो आम्ही ... माहेरी जाईन ... घटस्फोट देईन इतक्या थरपर्यंत जायची भांडणं, आता? ' कुणी एक विधवा साश्रूनयनांनी विचारत होती ... नाती, माणसं असतात तोवर किती निष्काळजी आणि बेफिकीर असतो नं आपण? जेव्हा परतायच्या वाटाच बंद होतात, तेव्हा कळते त्याची किंमत. *पण तोवर काळानं पान उलटलेलं असतं आणि ... आणि आपल्या हातात फक्त आठवणींच्या जखमांचं दान असत*ं.

म्हणूनच, या जन्माचा प्रत्येक क्षण आसुसून जगायला हवा. पूर्णविरामाचा क्षण, कुणास ठाऊक कधी राहील उभा!

सकाळी उठताना कंटाळा येतो? मग करून बघा विचार, सगळ्यांच्याच नशिबात कुठे असा सूर्य उगवतो? कुणी बिचारा झोपेतच जगाचा निरोप घेतो ... मग बिछाना सोडून ताडकन उठावंसं वाटेल. आळसाला रामराम ठोकावासा वाटेल ...

नोकरीवर जायचा कंटाळा आला तर जरूर आठवा ती बेरोजगारांची रांग ...

 स्वयंपाकाचा कंटाळा आला तर आठवावी खपाटीला गेलेली पोटं ...

 अभ्यासाचा कंटाळा आला तर डोळ्यासमोर आणावी ती अर्धनग्न कळकट मुलं, ज्यांना भीक मागण्यासाठी हात पसरावे लागतात सतत ... त्यांच्या हातात कुठून येणार पाटी? मिळत असून नाकारणारी, कंटाळणारी आपलीच कपाळकरंटी ...

भूतकाळ माझा नाही. भविष्यावर अधिकार नाही. पण वर्तमानातला प्रत्येक क्षण फक्त माझ्यासाठीच आहे. म्हणून तर वर्तमानाला इंग्लिशमध्ये प्रेझेंट म्हणतात. हे प्रेझेंट, हे बक्षीस, आपण सर्वार्थानं उपभोगायला हवं. सजगतेनं जगायला हवं.

 सुदृढ शरीराचा लाभ न घेता व्यसनाधीन होऊन छातीचं खोकं आणि किडनीची चाळणी करणारी मंडळी पाहिली की, अस्वस्थ व्हायला होतं. एकत्र कुटुंबात राहणाऱ्याला घरं तोडून स्वतंत्र व्हायचे डोहाळे लागले की, वाईट वाटतं.

आपला सगळा राग मुलांवर काढणारे पालक दिसले की, विचारावंसं वाटतं, मुलं नसण्याचं दु:ख पदरी नाही, याचा आनंद मानायचा सोडून, असलेल्या सुखावर हात कसा उगारता तुम्ही?
 अरसिक नवरा किंवा बायको पाहिले की त्यांना लग्नासाठी झुरणारी मंडळी दाखवावीशी वाटतात... आई-वडिलांना दुखावणाऱ्यांना अनाथालयात न्यावंसं वाटतं. सतत रडवेला मुखडा घेऊन जगणाऱ्यांना हॉस्पिटलला व्हिजिट द्यायला पाठवावंसं वाटतं. जगण्याचा कंटाळा आलाय असं म्हणत, इतरांना कंटाळा आणणाऱ्यांना कॅन्सरशी झुंजणाऱ्या पेशंटना भेटवावसं वाटतं. श्रीमंतांच्या श्रीमंतीचा हेवा करत कुढणाऱ्यांना, इस्टेटीच्या वादावरून झालेला रक्तरंजित इतिहास वाचून दाखवावासा वाटतो.

अपूर्ण इच्छांच्या पूर्ततेची हमी दशक्रिया विधीच्या वेळी देऊन पिंडाला कावळा शिवावा म्हणून प्रार्थना करण्यापेक्षा *ती व्यक्ती जिवंत असतानाच तो आपलेपणा आणि विश्वास दिला गेला असेल तर ...?*

 शूटिंगमध्ये शॉट चांगला झाला नाही तर रिटेक करतात. म्हणजेच पुन्हा तोच सीन करतात. पण आयुष्यात असे रिटेक घेत येत नसतात. *म्हणूनच प्रत्येक क्षणी वन टेक ओके व्हावा इतकं प्रसन्न जगलं तर ...?*💐💐💐

Wednesday, March 22, 2017




🔷कोण म्हणत सरकारी शाळा खराब आहे🔷

🔵उगाचच मुलांना नका धाडू कुणिकडे..
👉_सरकारी शाळा सारखे शिक्षण नाही दुसरीकडे.

🔵करतील भरमसाट फसवुन फी गोळा.
👉_गर्दीत हरवून जाईल पोटचा गोळा.

🔵गावची शाळा  सोडून पळू नका भलतीकडे.
👉_सरकारी शाळा.सारखे शिक्षण नाही दुसरीकडे.

🔵सरकारी शाळेत आहे सर्वांगीण विकास.
👉_लेखन वाचन गणित येईल झकास.

🔵पोषण आहारासंगे मोफत मिळतील कपडे.
👉_सरकारी शाळा.सारखे शिक्षण नाही दुसरीकडे.

🔵खाजगीच्या वर्गात बघा तोबा गर्दी.
👉_सरकारी शाळा चे शिक्षकच आहेत खरे हमदर्दी.

_👉यांच्या इतका अनुभव नाही त्यांच्याकडे_

🔵_सरकारी शाळा सारखे शिक्षण नाही दुसरीकडे.

🔵_गावची शाळा आपली ही आपुलकीची असते.
👉_लांबची ती लांबचीच असते.

🔵_माय सोडून धावू नका उगाच मावशीकडे_
👉_सरकारी शाळा सारखे शिक्षण नाही दुसरीकडे.

🔵_इंग्लिश मिडियम पेक्षा मराठीच भारी.
👉UPSC आणी MPSC मध्ये _सरकारी शाळा च्या पोरांची  स्पर्धेत गरुड़ भरारी.

🔵_कुणी होतय कलेक्टर कुणी होतय डॉक्टर तर कोणी होतय नामांकित इंजीनियर कोणी जातय पुढे.

👉सरकारी शाळा सारख शिक्षण नाही दुसरीकडे.

👉सरकारी शाळा सारखे शिक्षण नाही दुसरीकडे.

🔵कोण म्हणतंय सरकारी शाळा नाही भारी.

👉उदाहरणे देतोय तुम्हा शेकडो शेकडो खरी खरी

🔵डॉक्टर बाबा साहेब.🏆

🔵APJ अब्दुल कलाम.🏆

🔵अंतराळवीर कल्पना चावला.🏆

🔵सर एम विश्वेश्वरैया🏆

🔵 रामानुजन गणिती शोधक.🏆

🔵महत्मा फुले.🏆

🔵भरत आंधळे IRS🏆

🔵विश्वास पाटील नांगरे.IAS🏆

असे हज़ारों उदाहरणे देता येतील.

🏆💐💐💐💐💐💐💐🏆

🔵आपली शाळा.. सरकारी शाळा🔵

🙏🏻लक्षात ठेवा..फक्त सरकारी शाळा.

🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
👫👫👫👫👫👫👫👫👫👫👫
        *सरकारी शाळा*
👫👫👫👫👫👫👫👫👫👫👫

*स   -  सकारात्मक*

*र    -   रम्यं असा परिसर*

*का - काबिल बनवनारे शिक्षण.*

*री  -   रिश्वतखोरी अज्जिबात नाही असे ठिकाण.*

*शा - शारीरिक व मानसिक विकास करणारे ठिकाण*

*ळा - लळा* *लावणारे शिक्षण मिळते ते ठिकाण*

संकेतस्थळे

🏆🔹🏅Ⓜ🅰🅿🏅🔹🏆
*काही इतर उपयोगी सेवा देणारी संकेतस्थळे*
 
संगणकावर काम करताना बर्‍याच गोष्टी करण्यासाठी आपण निरनिराळे सॉफ्टवेअर्स वापरत असतो. परंतू असे जरी असले तरी दरवेळेस एखादी गोष्टी हवी असल्यास त्यासाठी लागणारे आवश्यक सॉफ्टवेअर इंटरनेटवरुन डाऊनलोड करुन आपल्या संगणकामध्ये ' इंस्टॉल ' करुन म्हणजेच लोड करुन त्यानंतर आपले काम करणे शक्य होत नाही. म्हणूनच इंटरनेटवर बरीचशी संकेतस्थळे निरनिराळी ऑनलाईन सेवा देतात म्हणजेच एखादी गोष्ट करण्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर डाऊनलोड न करता आपण ते काम ऑनलाईन आणि मोफत करु शकतो. अशाच काही आवश्यक कामासाठी लागणार्‍या संकेतस्थळांची यादी खाली दिली आहे.

 
*१*. ऑनलाईन टिव्ही सोबत मंदिरांचे ऑनलाईन दर्शन www.dittotv.com
*२*. इंटरनेटवरुन मोफत फोन करा www.call2friends.com
*३*. PDF फाईल बनविण्यासाठी संकेतस्थळ www.pdfonline.com
*४*. अनेक PDF फाईलींची एकच फाईल करण्यासाठी www.mergepdf.net
*५*. ऑनलाईन गाण्याचा प्रकार बदलण्यासाठी संकेतस्थळ www.mediaconverter.org
*६*. एखाद्या संकेतस्थळीची PDF फाईल बनविण्यासाठी www.pdfmyurl.com
*७*. फाईलचा प्रकार बदलण्यासाठी www.convertfiles.com
*८*. फाईलचा प्रकार बदलण्यासाठी www.online-convert.com
*९*. इंग्रजी - मराठी शब्दकोश (Dictionary) www.khandbahale.com
*१०*. ऑनलाईन टॅक्स भरण्याचे संकेतस्थळ www.incometaxindiaefiling.gov.in
*११*. आकाराने मोठ्या फाईल्स पाठविण्यास मदत करणारे संकेतस्थळ www.wetransfer.com
*१२*. गाड्यांच्या क्र. माहिती, फोन क्र., पीनकोडची माहिती मिळते. www.indiatrace.com

उपक्रम

🌸 आपला उपक्रम

*लग्नपत्रीका समजुया*

🎷🥁🎺👨‍❤‍👨🎷🥁🎺
आज मुलांचा शब्द संग्रह वाढावा
यासाठी प्रत्येक मुलाला घरुन विविध पत्रिका आणायला सांगितलं

🌷जसे
🎊🎉🎊🎉🎊
🥁लग्न पत्रिका
🎺 साखरपुडा पत्रिका
🏠 वास्तू शांती पत्रिका
😶 उपनयन संस्कार पत्रिका
 🙏🏻 दशक्रीया विधी पत्रिका
💝 वाढदिवस पत्रिका

जमा केल्या
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

५०० पत्रीका जमा झाल्या

💝💝💝💝

चला समजुया नविन शब्द
निमंत्रण ,
आमंत्रण ,
वर,
वधू,
कार्यक्रम ,
मुहुर्त,
निमंत्रक,
रोजी,
स.न.वि.वि.
आँफसेट,
पुण्यस्मरण,
अतिथी,
स्वागतोत्सुक ,
विवाह,
स्थळ,
प्रेषक,
कार्यवाहक,
संयोजक,
व्यवस्थापक ,
सहकार्य ,
विधी,
आहेर,,
कुर्यात,
मंगलम्,
कंडोलिन,
स्टँ.टा.
चि.सौ.का.
चि.
उठावणा,
कुलस्वामिनी ,
संयोजक,
समस्त.
भोजन,
टेण्ट
ग्रामस्थ
स्वयंपाकी,
सुरुचीभोजन,
गोरज,
आयु.
शादी, मुबारक
दूल्हा
दुल्हन
🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼

पाहिला ना शब्दकोश

🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

 चला वेगवेगळी आडनावे शोधुया

चौधरी,पाटील,चव्हाण, सुर्यवंशी, सपकाळे, कोळी.शिरसाठ,सोनवणे
आंटिया कनोजिया कांकरिया कापडिया कुटमुटिया कोडिया चोरडिया छाब्रिया झकेरिया झाझरिया डालमिया डियादेढिया दोडिया फिरोदिया बगाडिया , वगैरे
आडे, आंबवडे, आंबाडे, उंडे, उराडे, कदमबांडे, करडे, करंडे, काकडे, कातुर्डे, कानडे, कानफाडे, कारंडे, कासारखेडे(कर), काळगुडे, केकडे, कोरडे, खाटमोडे, खाडे, खांडे(कर), खांडे(भराड), खुडे, खोडे, खोतलांडे, खोपडे, खोब्रागडे, खोलंगडे, गराडे, गवांडे, गांगुर्डे, गाडे(कर), गायतोंडे, गावडे, गावंडे, गोजमगुंडे, गोडे, गोलांडे, घरवाडे, घांगुर्डे, घाडे, घालुगडे, घेवडे, घोडे, घोरपडे, चिंचवडे, जगनाडे, जमदाडे, जानगुडे, झगडे, झेंडे, टेकवडे, डोईफोडे, तांगडे, तायडे,

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
पत्रीकेवर

गावाची नावे शोधा
तालुके
जिल्हा कोणता नोंद करा

📚📚📚📚📚📚📚📚

विविध देवतांची  नावे

तसेच

नाम व्याकरण संज्ञा समजुया

🔍🔍🔍🔍🔍🔍
आवडती नावे

कठीण नावे लिहु या
स्रीलिंग व पुल्लिंग संकल्पना समजवली
🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵

पाहीलेल्या कार्यक्रमाचे वर्णन आपल्या शब्दात करुया

❤💛💚💙💜❤💛💚

विवाह काव्य समजवले


विवाह म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन
सनई चौघड्यांच्या मंजुळ स्वरात
नवजीवनात केलेले पदार्पण
सुख स्वप्नांच्या पाकळ्यांचे नाजूक उन्मीलन
सासर -माहेरच्या नात्यांची
मंगळसूत्रात केलेली पवित्र गुंफण
यासाठी हवा तुमचा शुभ आशीर्वाद व
शुभेच्छांची सुखद रम्य पखरण
म्हणूनच या शुभ विवाहाचे आपणास
आग्रहाचे निमंत्रणं !

💝🌸
ब्रह्म सुतामध्ये गाठ बांधली सात जन्मांची, पृथ्वीतलावर जोडी शोभते xxx व xxx ची
पुर्व जन्माची पुण्याई xxx घराण्याची, कन्या देउनी वाढविली कीर्ती नावाची
पुण्य पवित्र निर्मळ गंगा शंकराची, इंद्राची परी तशी सून शोभते xxx घराण्याची
सगे सोयरे इष्ट मंडळी येऊन शोभा वाढवावी मंडपाची
माथ्यावरती पडूद्या अक्षता तुम्हा सर्वांच्या आशिर्वादाची

💐💐💐💐💐💐💐💐
🔴
पत्रिकावरचा श्लोक

🔵
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
🔴
मङ्गलं भगवान् विष्णुः मङ्गलं गरुडध्वजः।
मङ्गलं पुण्डरीकाक्षो मङ्गलायतनो हरिः
 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

Wednesday, March 15, 2017

 

👉 *आंतरजिल्हाबदली संदर्भात निर्णय*👈
*दि.14/3/2017*
👉 *दोन दिवसात आंतर जिल्हा बदली मागणी बाबत अर्ज व माहिती ऑन भरण्यास सुरूवात..* 
👉 *बदल्या 31 मे पर्यंत होणारच*
👉 *माहिती राज्यस्तरावर एकत्रीत संगणीक्रुत होणार* 
👉 *प्रवर्ग निहाय सेवा जेष्ठेतेनुसार जेष्ठता यादी तयार होणार*
👉 *प्राधान्य क्रम असा..*
1) दोन्ही NOC असेल तर..
2) एक NOC असेल तर..
3) अट शिथील प्राधान्य
4) 29 सप्टेंबर 2011 च्या जी.आर.मधील प्राधान्य क्रम..
(अंपग शिक्षकाची नियुक्ती प्रवर्गातून असेल तरी संबधित प्रवर्गातच अपंग प्राधान्य क्रम मिळणार )
👉 *राज्य रोस्टर पूर्ण होईपर्यंत...फक्त रोस्टर पूर्ण झालेल्या जिल्हयातच रिक्त असलेल्या संवर्गाच्या बदल्या होणार*
👉🏻 *सर्व आंतरजिल्ह्या बदल्या आँनलाईन होणार.*
👉🏻 *बदल्या होण्यापुर्वी पदोन्नती केली जाईल*
👉🏻 *एक वर्षात राज्यस्तरीय रोष्टर करणार- राज्य रोस्टर नंतर कोणताही प्रवर्ग कोणत्याही जिल्हयात जाणार हरकत नाही*
👉🏻 *साखळी पद्धतीने बदल्या होणार- एक किंवा दोन जिल्हे मागता येणार*
👉🏻 *न्यायलीन प्रकरणे न्यायालयाच्या आदेशा प्रमाणे कार्यवाही होणार*
1) प्रस्ताव देताना बदली सेवा कालावधी अट पूर्ण झाल्याने अट शिथील न घेतलेले प्रस्ताव अट शिथील प्राधान्य क्रम धरावा..
2) आंतर जिल्हा बदली पूर्ण झाल्या शिवाय नवीन भरती करू नये..
3) जून मध्ये रोस्टर पूर्ण झाले तरी त्या जिल्हयात जून मध्ये बदल्या कराव्यात..
4) रोस्टर तपासणी चालू असलेल्या जिल्हयात रोस्टरच्या अधिन राहून 80 टक्के रिक्त पदे भरावीत..
.
.
🏀 *आंतरजिल्हाबदली निर्णय*🏀
*दि.14/3/2017*
👉🏻 *सर्व आंतरजिल्ह्या बदल्या आँनलाईन होणार.*
👉🏻 *बदल्या होण्यापुर्वी पदोन्नती केली जाईल*
👉🏻 *एक वर्षात राज्यस्तरीय रोष्टर करणार*
👉🏻 *साखळी पद्धतीने बदल्या होणार*
👉🏻 *दोन जिल्ह्याचा पंसती क्रम देणे बंधनकारक*
👉🏻 *विशेष संवर्गाला प्राधान्य देणार*
👉🏻 *संवर्ग निहाय सेवा जेष्टता यादी तयार करणार*
👉🏻 *न्यायलीन प्रकरणे न्यायालयाच्या आदेशा प्रमाणे कार्यवाही होणार*
👉🏻 *पुर्वी प्रमाणे 40% व 60% प्रमाण बदलीसाठी राहणार*
-------------------------------------
जिल्हांतर्गत २७फेब्रुवारीच्या शिक्षक बदल्यांच्या जी आर् मध्ये शिक्षक संघाच्या मागणीनुसार योग्य ते बदल करण्याचे सचिवांचे आश्वासन
लवकरच शुद्धीपत्रक काढले जाईल.

Monday, March 6, 2017

सर्व पालकांनी लक्षपूर्वक वाचा

मुंबई : शास्त्रीय संगीत कला, लोककला आणि चित्रकलेमध्ये प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना मार्च २0१८ पासून होणाऱ्या दहावीच्या परीक्षेत वाढीव गुण देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने शनिवारी घेतला. कोणत्या कलेसाठी हे वाढीव गुण दिलेले आहेत, त्याचा उल्लेख गुणपत्रिकेवर असेल.
१0 वर्षे अस्तित्वात असलेल्या, धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी असलेल्या व तीन वर्षांचा लेखा अहवाल सादर केलेल्या संस्थातून शास्त्रीय कलेची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कला क्षेत्रातील अतिरिक्त गुण देण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल. ज्या संस्थांची नोंदणी सांस्कृतिक कार्य विभागाकडे असेल, त्या संस्थेचे प्रमाणपत्र विद्यार्थ्याने प्राप्त केलेले असल्यास, विद्यार्थी ज्या शाळेत इयत्ता दहावीमध्ये शिकत आहे, त्या शाळेच्या मुख्याध्यापकामार्फत ते तपासून प्रमाणित करण्यात येईल. सर्व प्रकारच्या वाढीव गुणांचा विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी फायदा होईल.
शास्त्रीय नृत्य, गायन आणि वादन यामध्ये या विद्यार्थ्याने कमीत कमी पाच वर्षांचे शिक्षण मान्यताप्राप्त संस्थेतून घेतलेले असावे. मान्यताप्राप्त संस्थांच्या तीन परीक्षा उत्तीर्ण केलेल्या असल्यास, दहा गुण व पाच परीक्षा उत्तीर्ण केलेल्या असल्यास १५ गुण देण्यात येणार आहेत. या परीक्षा इयत्ता दहावीपर्यंत कधीही उत्तीर्ण केल्या तरी चालतील. शास्रीय नृत्य, गायन व वादन प्रकारात राष्ट्रीय, राज्यस्तरीय पारितोषिक/शिष्यवृत्ती प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यास वाढीव २५ गुण दिले जातील. तथापि, अशा विद्यार्थ्यास पहिला निर्णय लागू राहणार नाही.
आठवी, नववी आणि दहावीमध्ये लोककला प्रकारातील किमान ५० प्रयोग सादर केलेले असतील, अशा विद्यार्थ्यास १० गुण, तसेच २५ प्रयोगांसाठी ५ वाढीव गुण देण्यात येणार आहेत. आठवी, नववी आणि दहावीमध्ये राज्य शासनाच्या बालनाट्य स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यास अनुक्रमे १५, दहा आणि पाच गुण वाढीव देण्यात येणार आहेत. पहिलीपासून शालेय स्तरावर कोणत्याही राष्ट्रीय स्पर्धेत अभिनयाचा पुरस्कार मिळविलेल्या विद्यार्थ्यास दहा गुण तर राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पाच वाढीव गुण दिले जातील.
चित्रकलेच्या इंटरमिजिएट परीक्षेत ए ग्रेड प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना १५ गुण, बी ग्रेड प्राप्त करणाऱ्यांना दहा गुण तर सी ग्रेड प्राप्त करणाऱ्यांना पाच गुण वाढीव दिले जातील. कला क्षेत्रासाठी असणाऱ्या दोन टक्के आरक्षणामध्ये (प्रवेशासाठी) शास्रीय गायन/नृत्य/वादन या कला प्रकारात प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत चित्रकलेची इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचादेखील समावेश करण्यात येणार आहे.(विशेष प्रतिनिधी)
लोककला अभ्यासक्रम
लोककला क्षेत्रातील अभ्यासक, संस्था व मंडळे यांच्याकडून लोककलांसंदर्भातील अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागाची अभ्यास समिती त्यावर शिक्कामोर्तब करेल. या अभ्यासक्रमाच्या चार परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यास २० वाढीव गुण आणि तीन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यास १५ वाढीव गुण देण्यात येतील.
शास्त्रीय कला, चित्रकला आणि लोककलांची रुजवात शालेय जीवनापासूनच व्हावी, यासाठी प्रोत्साहन म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. या कलांना राजाश्रय देण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेचा हा महत्त्वाचा टप्पा आहे.
आपल्या पाल्यातील कला ओळखून वेळीच प्रशिक्षण सुरु करा🙏🏼
- शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री

प्लास्टिकच्या बाटलीपासून पंखा तयार करणे

      प्लास्टिकच्या बाटलीपासून पंखा तयार करणे

Saturday, January 28, 2017

ADARSH PARIPATH


shala bhet vargasathi asavi


ज्ञान रचनावाद व्हिडिओ


शिक्षकांना ऑनलाइन हजेरी सक्तीची

शिक्षकांना ऑनलाइन हजेरी सक्तीची , हजेरीचा फोटो पाठवा 
म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ
जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षक वारंवार शाळेत गैरहजर राहात असल्याच्या अनेक तक्रारी आल्यावर यवतमाळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला यांनी शिक्षकांना दररोज ऑनलाइन हजेरी पाठविण्याची सक्ती केली आहे. या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. ऑनलाइन हजेरीला अनेक शिक्षक संघटनांनी विरोध सुरू केला असला तरी अनेक शिक्षकांनी ऑनलाइन हजेरी पाठविणे सुरू केले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील शिक्षकांची दैनंदिन हजेरी रोजच्या रोज व्हॉटस्अॅपवर मागविली आहे. शिक्षकांना सकाळी साडेदहा वाजता हजेरी रजिस्टरचा फोटो शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविणे आवश्यक केले आहे. हीच खरी अडचण बहुसंख्य शिक्षकांची आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळांमधील शिक्षक मुख्यालयी राहात नाही. जिल्हा किंवा तालुक्याच्या ठिकाणीच राहात असतात. केवळ १५ ऑगस्ट व २६ जानेवारी या दोन राष्ट्रीय सणाला पांढरे कपडे घालून शाळेमध्ये सकाळीच उपस्थित असतात. पण, सिंगला यांच्या ऑनलाइन हजेरीच्या आदेशाने अशा शिक्षकाची अडचण झाली आहे. त्यामुळे शाळेमध्ये मोबाइलची रेंज नसल्याचा कांगावा या शिक्षकांनी सुरू केला आहे. या आदेशाला विरोध करण्यासाठी शिक्षक अन्याय निवारण समिती तयार करण्यात आली असून सर्व शिक्षक संघटना या आदेशाला विरोध करणार असल्याचे समितीचे निमंत्रक पुरुषोत्तम ठोकळ यांनी सांगितले. तर दुसरीकडे शिक्षकांच्या ऑनलाइन हजेरीवर मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला ठाम आहेत. दरम्यान, वेळेवर शाळेत न जाणारे शिक्षकच मोबाइल रेंज नसल्याचा कांगावा करीत आहेत. जिल्ह्यात नेटवर्कची समस्या फारच कमी ठिकाणी आहे. नेटवर्क नसलेल्या शाळेत पर्यायी व्यवस्था करू. शिक्षण विस्तार अधिकारी विशेष लक्ष देतील. पण, ऑनलाइन हजेरीतून शिक्षक पळवाटा काढू शकणार नाहीत, असे मत सीईओ दीपक 
राज्यात सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी समितीची स्थापना
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - राज्यभरातील शासकीय अधिकारी-कर्मचारी 20 ते 25 जानेवारी दरम्यान संपावर जाणार होते. मात्र, सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी निवृत्त सनदी अधिकारी के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय सोमवारी रात्री राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी जाहीर केला. त्यामुळे या मागणीकरिता जाहीर केलेले आंदोलन तूर्त स्थगित केल्याची माहिती अधिकारी महासंघाचे नेते ग. दि. कुलथे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
राज्यात महापालिका जि.प. निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीबाबत कोणतीही घोषणा सरकार करु शकत नाही, असे सूत्रांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत 10 जानेवीरी रोजी तीन दिवस संपाचा निर्णय घेण्यात आला होता. विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य शासकिय कर्मचा-यांनी संप पुकारला होता. मागण्यांबाबत राज्य सरकार वेळकाढूपणा करत असल्याबाबत याबैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. 1 जाने 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू करावा ही कर्मचा-यांची मुख्य मागणी आहे.
याशिवाय निवृत्तीचं वय 60 वर्ष करावं, महिला अधिकाऱ्यांना दोन वर्षांची बालसंगोपन रजा मिळावी, पाच दिवसांचा आठवडा करावा तसेच रिक्त पदं योग्य वेळेत भरावी अशा विविध मागण्या आहेत.

दप्तर

दप्तर